- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सुधारित निम्न विधी स्वयंसेवक योजनेवर जागृती कार्याक्रमांचे आयोजन करणे
- खालील विशेष दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत :
- जागतिक एड्स दिन (१ डिसेंबर)
- आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन (३ डिसेंबर)
- जागतिक मानवाधिकार दिन(१० डिसेंबर)
- राष्ट्रीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर)
- खालील विषयांवर जागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे:
- शाळा व महाविद्यालयात बालकांवर लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची लागुता
- दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६
- मुलभूत कायदे, त्यांची कार्ये व कर्तव्ये याबाबत निम्न विधी स्वयंसेवकांसाठी उजळणी अभ्यासक्रम आयोजित करणे.
- तालुका स्तरावरील विधी सेवा समित्यांना सहभागी करून जिल्हा मुख्यालय येथे आढावा सभा आयोजित करणे.
- खालील कायद्यांच्या बाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे :
- कुटुंब कायद्यांच्या बाबत .
- विवाह, वारसा अधिकार, दत्तक, मध्यस्थीचे महत्व यांच्याशी संबंधित कायदे.
- कारागृह, सुधारगृहे, बालसुधारगृहे, मानसशास्त्रीय , संरक्षणात्मक आंतरपृष्ठे, निवासी शाळा इत्यादींशी समन्वय साधून माहिती पाठबळ व मदतीच्या अभावी तेथील संस्थावासीयांच्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची खातरजमा करणे.
- खालील समाज विघातक गोष्टीशी संबंधित विधी साक्षरता शिबिरे आयोजित करणे:
- हुंडा,
- जातीय भेदभाव,
- स्त्री भृणहत्या व अन्य प्रचलित समाज विघातक रूढी व परंपरा.
- विशेष विघातक रूढी परंपरांचे दुष्परिणाम अधोरेखित करून त्यांचे निर्मुलन करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सभा आयोजित करणे.