बंद करा

    जानेवारी २०२४

    • सुरुवातीची तारीख : 01/01/2024
    • शेवटची तारीख : 31/12/2025
    • स्थळ : Mumbai

    Common Minimum Programme

    1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (ज्येष्ठ नागरिकांसाठी विधी सेवा) योजना २०१६ बाबत जागृती कार्यक्रमांचे आयोजन
    2. खालील विशेष दिवस साजरे करण्यात आले
      • राष्ट्रीय मानवी तस्करी जागरुकता दिन (११ जानेवारी)
      • राष्ट्रीय युवा दिन (१२ जानेवारी)
      • बालिका दिन (२४ जानेवारी)
      • राष्ट्रीय मतदार दिन (२५ जानेवारी)
      • गणराज्य दिन (२६ जानेवारी)
    3. खालील विषयांवर जागृती कार्यक्रमांचे आयोजन केले :
      • रस्ते सुरक्षा व वाहतूक विषयक खुणा व चिन्हे
      • सत्प्रवृत्त व्यक्तींचे संरक्षण
      • अटक पूर्व, अटक झाल्यावर व कोठडी मध्ये सुलभतेने न्याय मिळणे
      • सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि केंद्र / राज्य शासनाच्या योजना
    4. स्त्री भृणहत्येचे वाईट व दंडनीय परिणाम अधोरेखित करण्यासाठी विधी साक्षरता / जागृती शिबिरे आयोजित करण्यात आली. बेटी बचाव – बेटी पढाव या राष्ट्रीय अभियानाच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करून शाळा / महाविद्यालयांमध्ये व्यापक स्तरावर जनजागृती शिबिरे आयोजित करणे . स्त्री भृणहत्येचे संकट आणि त्या विकृत पापाला आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर तरतुदींच्या बाबत सामान्य जनमानसात जागृती व जागरुकता असणे आवश्यक आहे.

    5. पिडीत नुकसानभरपाई योजने बाबत विधी साक्षरता मोहीम आयोजित केली.
    6. निम्न विधी स्वयंसेवकांच्या उपयुक्ततेचा विचार करून त्यांच्या कामगिरी व अधिकारांचा आढावा.
    7. विधी सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी बाल न्याय मंडळावर कार्यरत नामिकेवरील अधिवक्त्यांसाठी चर्चासत्र / प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
    8. कामाच्या स्थानी महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध, निषेध व निराकरण अधिनियम २०१३ अन्वये तरतुदी बाबत संवेदन होण्यासाठी कार्यशाळा संचालित व जागृती कार्यक्रम आयोजित करणे.