- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आपत्ती पिडीतांसाठी विधी सेवा योजनेच्या अंतर्गत विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
- खालील विशेष दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावे :
- जागतिक आरोग्य दिन (७ एप्रिल)
- जागतिक पृथ्वी दिन (२२ एप्रिल)
- खालील विषयांवर विधी साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात यावे:
- बाल कामगार
- भिक्षेकरी बालके
- बालकांची तस्करी
- सार्वजनिक उपयुक्तता सेवांच्या बाबत कायदेशीर जागृती शिबिरे आयोजित करावीत.
- गर्भधारणा पूर्व व प्रसूती पूर्व निदान तंत्र अधिनियमा बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत
- बाल विवाहावर असलेल्या प्रतिबंधावर अभियान
- शाळेतून गळालेल्या बालकांना परत शाळेत आणण्यासाठी अभियान (निम्न विधी स्वयंसेवकांच्या सहाय्याने शाळेतून गळलेली बालके निर्धारित करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्याना परत शाळेत भरती करण्यासाठी विशिष्ट अभियान चालवेल.
- बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार २००९ च्या संदर्भाने भारतीय राज्यघटनेतील भाग ४ अ मधील मुलभूत कर्तव्यांबाबत विधी जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करावे
- कच्च्या कैद्यांचा आढावा घेणाऱ्या समितीची सभा.