बंद करा

    फेब्रुवारी २०२४

    • सुरुवातीची तारीख : 01/02/2024
    • शेवटची तारीख : 31/12/2025
    • स्थळ : Mumbai

    Common Minimum Programme

    1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (भिन्न सक्षम बालकांसाठी विधी सहाय्य) योजना २०२१ बाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले
    2. खालील विशेष दिवस साजरे करण्यात आले :
      • जागतिक सामाजिक न्याय दिवस (२० फेब्रुवारी)
      • मराठी भाषा संवर्धन दिन (२७ फेब्रुवारी)
    3. खालील विषयांवर वेगवेगळे जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे :
      • माहितीचा अधिकार २००५
      • महाराष्ट्र सार्वजनिक सेवा अधिकार अधिनियम २०१५
      • दावा न्यायाधिकरण संमती प्रक्रिया
      • पालक व ज्येष्ठ नागरिक पोटगी व कल्याण अधिनियम
      • ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्य योजना
      • तृतीयपंथीयांच्या कायदेशीर समस्या व त्यावरील उपाययोजना
    4. विधी सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नामिकेवरील अधिवक्त्यांसाठी प्रशिक्षण व चर्चासत्र / ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करणे
    5. खालील विषयांवर विधी साक्षरता शिबिरे आयोजित करणे :
      • अन्न व शिक्षणाचा अधिकार
      • पिडीत नुकसानभरपाई योजना
    6. खालील विषयांवर विधी साक्षरता कार्यक्रम आयोजित करणे :
      • तृतीय पंथीयांचे अधिकार
      • बालिकांच्या विरुद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसाचारांचे निर्मुलन करण्यासाठी उपाययोजना करणे.
    7. बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियमा बाबत शाळा व महाविद्यालयात जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
    8. बचाव पक्षासाठी विधी साहाय्य योजनेच्या अंतर्गत कार्यरत समुपदेशकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम / चर्चासत्रे आयोजित करणे (फक्त जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी)