दृष्टीकोन आणि उद्देश्य
दृष्टीकोन
वंचित व परिघावरील समाजाला अर्थपूर्ण व समुचित न्याय मिळवून देण्यासाठी समावेशक विधी व न्याय प्रणालीस प्रोत्साहन देण्याचा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचा दृष्टीकोन आहे.
उद्देश्य
- प्रभावी कायदेशीर प्रतीनिदित्वाची व्यवस्था करून वंचित व परिघावरील वर्गाला कायद्याने अधिक सक्षम करणे.
- कायद्याने उपलब्ध असेलेले लाभ आणि त्यावर अधिकार असलेल्या लाभार्थ्यांमध्ये कायदेशीर साक्षरता आणि जागृतीवर भर देऊन त्यांच्या मधील तफावत भरून काढणे.
- विवादांचे अनौपचारिक, त्वरित, स्वस्त व प्रभावी निराकरण करून लोक अदालत व अन्य पर्यायी विवाद निराकरण यंत्रणा मजबूत करण.